पुणे:सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त सुर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी डॉ. रघुनाथ माशेलकर बोलत होते. सुर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, अक्षरधाम परिवाराचे ज्ञानवत्सल स्वामी महाराज, भजनसम्राट अनुप जलोटा, मुरलीकांत पेठकर, अभिनेता रझा मुराद, सुर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, प्रशांत पितालिया आदी उपस्थित होते.
सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार प्रदान: अक्षरधाम मंदिराचे ज्ञानवत्सल स्वामी महाराज (द मॉडर्न सेंट ऑफ इंडिया), ज्येष्ठ माध्यम व्यावसायिक विजय दर्डा, राष्ट्रीय मुख्य सल्लागार डॉ. गुलशन राय, बँकिंग व सहकार तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, विधिज्ञ ऍड. सुधाकर आव्हाड, ज्येष्ठ गायक पं. सुहास व्यास, ज्येष्ठ अभिनेते रणजित बेदी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल शहा, डॉ. धीरज शहा (ग्लोबल अवार्ड) यांना सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दर्डा यांच्या वतीने जेष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी पुरस्कार स्वीकारला आहे.
सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार प्रदान: अर्थविषयक अर्थक्रांती संस्था (अनिल बोकील), आंतरराष्ट्रीय कलाकार सुदर्शन पटनाईक, संगीतकार अबू मलिक, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ गुरमित सिंग, सामाजिक कार्यकर्ते शेखर मुंदडा, अध्यात्मिक गुरु सरिताबेन राठी, ट्रेनर अँड कन्सल्टंट ओमी भटनागर, अभिनेता मंगेश देसाई, गिर्यारोहक उमेश झिरपे, अर्थतज्ज्ञ रवींद्र बोरटकर, कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ प्रा. एम. नाझरी (ग्लोबल अवॉर्ड) यांना सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासह अदम्या राज (ग्लोबल अवॉर्ड), डिजिटल इंफ्लून्सर कृष्णराज महाडिक, भूशास्त्र अभ्यासक सोनित सिसोलेकर यांना सूर्यदत्त नॅशनल यंग अचिव्हर अवॉर्ड, तर ऍप डिझायनर अनोष्का जॉली, मेंटॉर अवि शर्मा, बालकलाकार देशना दुगड यांना सूर्यदत्त लिट्ल मास्टर नॅशनल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
डिजिटल क्रांतीमुळे जगण्याचा स्तर उंचावला:डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले की, शिक्षणातून समाज घडतो. संशोधनातून ज्ञानाची निर्मिती होते. इनोव्हेशनमधून उत्पादन विकसित होते. त्यामुळे सर्वांगीण विकास, संशोधन व इनोव्हेशन ही विकासाची त्रिसूत्री आहे. त्याला परस्पर सहकार्य, भागीदारीची जोड हवी. उत्तम मार्गदर्शक पाहिजे, माजी विद्यार्थी ही संस्थेची ताकद असते. डिजिटल क्रांतीमुळे जगण्याचा स्तर उंचावला आहे. स्टार्टअपसना प्रोत्साहन मिळत आहे. टीम इंडिया वन इंडिया या विचारावर काम केले, तर भारत सर्वांगीण प्रगतीचे ध्येय गाठू शकेल. तर समाज आणि देशासाठी अभिमान वाटेल अशा व्यक्तींचा हा सन्मान सोहळा आहे. चोरडिया दाम्पत्य अशा आदर्श व्यक्तिमत्वाना विद्यार्थ्यांसमोर, समाजासमोर आणून प्रेरणा देत आहे, असे डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले.
भारतीय परंपरा व संस्कृतीचा वारसा: ज्ञानवत्सल स्वामी महाराज म्हणाले की, गुरुकृपा हा अध्यात्माचा गाभा आहे. गुरू आपल्याला प्रेरणा देत असतो. प्रमुख स्वामी महाराज ही आमची प्रेरणा आहे. प्रमुख स्वामी महाराजांनी ४५ वर्षात १३०० संस्था उभारल्या. मीपणाचा अहंभाव सोडून निस्वार्थ सेवा करावी. अक्षरधाम भारतीय परंपरा व संस्कृतीचा वारसा आहे. जगभरात अक्षरधाम मंदिरे उभारली जात आहे. त्याद्वारे मानवता, मूल्ये, विचारधन देण्याचा प्रयत्न आहे. २०४७ पर्यंत भारत पूर्णतः आत्मनिर्भर झाला पाहिजे. समृद्ध व सकारात्मक विचारांचा अंगीकार करावा. वेळेचे नियोजन, चांगली संगत करण्यासह सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक समतोल साधण्याची क्षमता विकसित करावी. प्रामाणिक प्रयत्न आणि भाग्य याचा ताळमेळ घातला तर यशस्वी होता येते.
रौप्य महोत्सव साजरा: आचार्य डॉ. लोकेश मुनीजी म्हणाले की, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. सर्वांगीण विकासाचे, मूल्यांचे शिक्षण देऊन भारताच्या प्रगतीत योगदान देऊ शकेल, अशा पिढ्या घडविण्याचे काम सुषमा आणि संजय चोरडिया करत आहेत. भारतीय संस्कृती, मूल्ये व परंपरा जपण्याचे दायित्व आपल्यावर आहे. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सांगितले की, यंदा सुर्यदत्त संस्था रौप्य महोत्सव साजरा करत आहे. या विशेष वर्षात जीवनगौरव, राष्ट्रीय पुरस्कार, यंग आचिव्हर व लिटल मास्टर पुरस्काराने २५ व्यक्तींना सन्मानित करण्यात येत आहे. समाजाच्या, देशाच्या प्रगतीत भरीव योगदान देणाऱ्या, यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या या व्यक्तींचे कार्य प्रेरणादायी आहे.
हेही वाचा: Aryabhushan Theater : महाराष्ट्राची लोककला जपणारे 'आर्यभूषण' ऐतिहासिक थिएटर, शंभर वर्षाचा साक्षीदार सरकारकडून उपेक्षित