महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'एनआरसीच्या अंमलबजावणीसाठी हजारो कोटी रुपये व्यर्थ खर्च होतील' - dr. bhalachandra mugnekar pune latest news

एनआरसीच्या अमंलबजावणीसाठी हजारो कोटी रूपये खर्च व्यर्थ जातील, असे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि काँग्रेस नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

Dr. Bhalchandra Mungekar.
डॉ. भालचंद्र मुगणेकर

By

Published : Dec 26, 2019, 4:05 PM IST

पुणे - एनआरसी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी साडेचार लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. इतका खर्च करण्यापेक्षा हेच पैसे लोकांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी खर्च करावे, असे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि काँग्रेस नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. राजीव गांधी स्मारक समितीतर्फे मुगणेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर आपले विचार व्यक्त करताना.

पुढे बोलताना ते म्हणाले, देशात सुशिक्षित बेरोजगारी प्रचंड वाढत आहे. त्यामुळे तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत आहे. आणीबाणीला जो विरोध केला होता तो राजकीय पक्षांनी केला होता. मात्र, पहिल्यांदाच देशात इतका मोठा विरोध होताना दिसत आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात भाजप आणि आरएसएस सोडून सर्व जनता रस्त्यावर उतरली आहे. समतेच्या ऐवजी विषमता निर्माण करणारे, हे विधेयक आहे. हा कायदा आहे, मुस्लिमांच्या विरोधात तसेच संविधानाच्या विरोधात आहे. इतकेच नव्हे तर हिंदूंच्यादेखील विरोधात असल्याचे मुणगेकर म्हणाले.

हेही वाचा -ठाकरे सरकार ॲक्सिस बँकेला देणार धक्का.. पोलिसांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळविण्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details