पुणे : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर ( Maharashtra Karnataka Borderism ) एकीकडे महाराष्ट्राचे मंत्री महापरिनिर्वाण दिनांना गालबोट लागू नये म्हणून कर्नाटक दौरा रद्द करत असतानाच महापरिनिर्वाण दिनासाठी ( Mahaparinirvana day ) महाराष्ट्रात आलेल्या भीम अनुयायांना मात्र या सीमावादाचा फटका बसला आहे.
MH Karnataka dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा भीम अनुयायांना फटका; 70 ते 80 अनुयायी पुण्यात अडकले - B Maharashtra Karnataka borderism
6 डिसेंबरला मुंबईत लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायांनी येत असतात. महापरिनिर्वाण दिनामध्ये असतानाच पुण्यात कर्नाटकच्या बसेसना काळ फासण्यात आले. महाराष्ट्रात आलेल्या भिमा अनुयांना मात्र या सीमावादाचा फटका बसला आहे.
कर्नाटकच्या बसेसना काळ फासण्यात आले: 6 डिसेंबरला मुंबईत लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुययांनी येत असतात. त्याचप्रमाणे कर्नाटकातील गदक शहरांमधून सुद्धा दोन एसटी बसेसच्या गाड्यांमध्ये हे अनुयायी मुंबईला आले होते. त्यानंतर ते महापरिनिर्वाण दिनामध्ये असतानाच पुण्यात कर्नाटकच्या बसेसना काळ फासण्यात आले. शिवसेना मनसेंना आंदोलन केले आणि त्याचा फटका या अनुयायांना बसलेला आहे. हे अनुयायी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात अडकून पडलेले आहेत. त्याने नाष्टा आणि जेवण्यासाठी ते थांबलेले आहेत. त्यांना अपेक्षा आहे की पोलीस संरक्षणामध्ये त्यांना महाराष्ट्राच्या सीमे बाहेर पोहोचवण्याची मागणी हे सगळे प्रवासी करत आहेत.
सर्वसामान्यांना फटका: महाराष्ट्र सीमावादाचा आंदोलन आणि राजकारण दोन्ही जरी मोठ्या प्रमाणात चिघळत असले तरी त्याचा फटका सर्वसामान्य प्रवासाबरोबर अशा महोत्सवाला महापरिनिर्वाण दिलेला आलेल्या लोकांना सुद्धा बसत आहे. ताबडतोब यावरती सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे. जेणेकरून महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात जाण्यासाठी आणि कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात येण्यासाठी सोयीचे होईल परंतु याचा फटका सर्वसामान्यांना बसताना दिसत आहे.