पुणे -मास्कमुक्त महाराष्ट्र हा अनाकलनीय विचार आहे, असे मत आएमएचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे ( Dr. Avinash Bhondve with ETV Bharat ) यांनी व्यक्त केले आहे. राज्य मंत्रिमडळाच्या काल झालेल्या बैठकीत मास्क मुक्त महाराष्ट्र ( Mask Free Maharashtra ) या विषयावर चर्चा झाली. मास्कची सक्ती आहे ती हटवून खरेच राज्य मास्क मुक्त होऊ शकतो का, या विषयावर काल चर्चा झाल्याची माहिती आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात होते. ( Corona's Third Wave in Maharashtra ) राज्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत होती. त्यातच आता ही रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी धोका हा जास्ती नाही. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क हा एकमेव उपाय असल्याचं तज्ञांकडून वारंवार सांगितलं जात होतं. मास्क वापरामुळे आपण कोरोना संसर्गाला ९५ टक्के टाळू शकतो, हे देखील सिद्ध झाले आहे. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट ओसरत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मास्क मुक्त करण्याचा विचार सरकार करत असल्याचं समोर आले आहे.
मास्क मुक्ती शक्य नाही - अविनाश भोंडवे