महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolhe Vs Adhalarao : बैलगाडा शर्यतीच्या निर्णयानंतर आजी- माजी खासदार पुन्हा आमनेसामने - Jallikattu Bullock cart

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने बैलगाडा प्रेमींना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने बैलगाडा शर्यतींमधील कायदेशीर अडचणी दूर झाल्या आहेत. बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. तर या निर्णयाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी स्वागत केले आहे.

Dr Amol Kolhe and Adhalrao Patil
डॉ.अमोल कोल्हे व आढळराव पाटील

By

Published : May 18, 2023, 7:20 PM IST

Updated : May 18, 2023, 10:50 PM IST

बैलगाडा शर्यतीच्या निर्णयानंतर बोलताना आजी माजी खासदार

पुणे: बैलगाडा मालक व बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीलापरवानगी दिली आहे. तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकारच्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज निकाल दिला आहे. या याचिकांमध्ये तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकारने 'जल्लीकट्टू' आणि बैलगाडी शर्यतींना परवानगी देण्यासाठी केलेल्या कायद्याला आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती केएम जोसेफ, अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषिकेश रॉय आणि सीटी रविकुमार यांचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठाने निकाल दिला आहे. या निर्णयानंतर आता जिल्ह्यातील आजी माजी खासदारांमध्ये श्रेय वादाचा लढा हा सुरू झाला आहे.



बैलगाडा स्पर्धांना सुप्रीम कोर्टात यश: या निर्णयानंतर खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बैलगाडा स्पर्धाबाबात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र या याचिका हटवून बैलगाडा स्पर्धांना सुप्रीम कोर्टात अखेर यश मिळाले. ही कायदेशीर लढाई लढण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कायदेशीर लढाई केली. त्यामधे त्याना आज अखेर यश आले. बैलगाडा स्पर्धा बाबत जो सुप्रीम कोर्टाने दिला आहे. हा सर्व सामान्य शेतकऱ्याचा विजय आहे, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यानी केले.

बैलगाडा स्पर्धा बाबत जो सुप्रीम कोर्टाने दिला आहे. हा सर्व सामान्य शेतकऱ्याचा विजय आहे - खासदार अमोल कोल्हे



बैलगाडा शर्यत कायमस्वरूपी सुरू व्हावी: सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यानंतर या निर्णयाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी स्वागत केले. बैलगाडा शर्यत कायमस्वरूपी सुरू व्हावी. यासाठी गेली दहा वर्षापासून मी संसदेत असेल सर्वोच्च न्यायालयात लढा देत होतो, मात्र बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाली. मात्र सध्याच्या काळात राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाला बैलगाडा शर्यती भरवल्या जातात. बैलगाडा शर्यती सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, राजकीय नेते हे स्वतःच्या स्वार्थासाठी याचा उपयोग करत असल्याचे खेदाने सांगावे लागत असल्याचे आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

बैलगाडा शर्यती सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, राजकीय नेते हे स्वतःच्या स्वार्थासाठी याचा उपयोग करत आहे. - माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील

हेही वाचा -

  1. Amol Kolhe on Sambhaji Maharaj राजकारणात अडकण्यापेक्षा भावी पिढीपर्यंत संभाजी महाराजांचा इतिहास पोहचविण्यासाठी प्रयत्नशील अमोल कोल्हे
  2. Amol Kolhe खासदार अमोल कोल्हे दानवे यांच्या ऑफिसच्या उद्घाटनाला जालन्यात
  3. Amol Kolhe News फ्री पासकरिता पोलिसांची आयोजकांना धमकी अमोल कोल्हेंनी भर कार्यक्रमात प्रेक्षकांना सांगितली माहिती
Last Updated : May 18, 2023, 10:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details