महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. अजय चंदनवाले यांची बदली हा राजकीय बळी, मनसेचा आरोप

स्थानिक राजकारण्यांच्या हस्तक्षेपास ससून रुग्णालयात केलेली बंदी, हे प्रमुख छुपे कारण या बदली मागे आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे.

By

Published : Apr 17, 2020, 7:47 PM IST

Updated : Apr 17, 2020, 9:05 PM IST

पुणे - ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची राज्य सरकारने तडकाफडकी बदली केली आणि त्यांच्याकडे पहिल्यापासून असलेल्या वैदकीय शिक्षण खात्याचा सहसंचालक पदाचा कार्यभार पूर्ण वेळ सोपविण्यात आला आहे. मात्र, या बदली मागे राजकारण असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

ससून रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यूदर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आली आहे, असे जरी सरकारकडून भासवण्यात येत असले तरी सरकारमधील इतर राजकीय पक्षांची मर्जी सांभाळण्यासाठी डॉ. चंदनवाले यांचा बळी घेण्यात आला आहे, हे आम्हाला माहीत आहे. गेले 4 दिवस शहरातील काँगेसचा त्या भागातील एक नगरसेवक याबाबत बोलत होता. स्थानिक राजकारण्यांच्या हस्तक्षेपास ससून रुग्णालयात केलेली बंदी, हे प्रमुख छुपे कारण या बदली मागे आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे.

मनसे

अशा पद्धतीने होणाऱ्या बदल्या या त्या-त्या क्षेत्रात सेवा देणाऱ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या आहेत. इतकेच नाही तर या सर्वांचा परिणाम त्यांच्या कामावर देखील होणार आहे.

डॉक्टर चंदनवाले यांची जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्तीनंतर अवघ्या सहा महिन्यात राज्य सरकारने त्यांची पुन्हा पुण्यात बी.जे वैद्यकीय महाविद्यालयात बदली केली आणि आता पुन्हा त्यांची अत्यंत वाईट पद्धतीने बदली करण्यात आली. हे गंभीर आहे असा आरोप मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केला.

Last Updated : Apr 17, 2020, 9:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details