पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी ( Tukuram maharaj samadhi in Dehu ) महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन लाखो भाविक येत असतात. त्यावेळी प्रत्येक भाविक तुकोबांच्या चरणी काही दान ( Tukaram Maharaj Mandir Dehu Donation ) टाकत असतो. आज तब्बल दोन महिन्यानंतर देहूच्या मंदिरातील दानपेटया मोजणीसाठी उघडण्यात आल्या. यावेळी आळंदी मधील स्वकाम सेवा संस्थेच्या महिलांनी प्रत्येक रुपयांच्या नोटा वेगवेगळ्या केल्या. या वेगळ्या केलेल्या नोटा आणि नाणी यांची मोजणी देहू संस्थानच्या विश्वस्तांकडून उद्या पासून करण्यात येणार आहे. अंदाजे 10 ते 12 लाख रुपयांच दान तुकोबा चरणी आल्याचा अंदाज देहू संस्थानचे विश्वस्त नितीन महाराज मोरे यांनी व्यक्त केला आहे.
Dehu Donation : देहूत तुकोबांच्या चरणी तब्बल 10 ते 12 लाखांचे दान - Donation of 10 to 12 lakhs
देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी ( Tukuram maharaj samadhi in Dehu ) भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान केले आहे. आज तब्बल दोन महिन्यानंतर देहूच्या मंदिरातील दानपेटया मोजणी साठी उघडण्यात आल्या. अंदाजे 10 ते 12 लाख रुपयांचे दान ( Donation of 10 to 12 lakhs ) तुकोबा चरणी आल्याचे देहू संस्थानचे विश्वस्त नितीन महाराज मोरे सांगितले.
कोरोना रोखण्यासाठी नियमांचे पालन : तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरातील सेवेकरी आणि संस्थेमार्फत कडक नियमावली अमलांत आणनार असल्याचे सूतोवाच देहू संस्थान अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूच्या मंदिरात येत असतात. वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता देहूच्या मंदिरात भाविकांना मास्कसक्ती करण्यात आलेली नाही. परंतु, आपल्या आपल्या परीने प्रत्येक भाविकाने आपली काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मास्क लावण्याचे आवाहन : देहूच्या मुख्य मंदिरात दर्शन रांगेत सॅनिटायजर मारून स्वच्छता करण्यात येते. त्यामुळे आता केवळ भाविकांनी येताना मास्क लावावा असे आवाहन करण्यात आले असून मंदिरात येताना मास्क लावणे बंधनकारक नसल्याचे देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी सांगितले आहे.