पुणे - मुंबईचा डॉन मन्या सुर्वे हा माझा मामेभाऊ आहे, असा खुलासा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केला आहे. मीही त्याच्या सारखा होऊ नये म्हणून माझी आई मला गावाला घेऊन गेली, असे नाना म्हणाले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या कलारंग सांस्कृतिक कला संस्था बोलत होते. दंगली वेळी सामान्य नागरिक हिंसक होतो, तो आतून तुंबलेला असतो. व्यक्त न होणे हा गुन्हा आहे, असंही नाना म्हणाले.
हेही वाचा -'अर्थमंत्र्यांचा नाही तर पंतप्रधानांचाच असणार हा अर्थसंकल्प'
नाना पाटेकर म्हणाले, की गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या आईच्या बाजूने, मामाची मुलंही तशी होती. त्यांच्यापासून मी लांब राहावं म्हणून आई मला मुरुडला घेऊन गेली. मन्या सुर्वे हा माझा मामे भाऊ आहे. मला असे वाटतं, की मीही त्याच्या सारखा होऊ नये म्हणून आई मला गावाला घेऊन गेली. गुंड हे शांत असतात. अशिक्षित माणूस गुंड झालेला परवडतो. सुशिक्षित माणूस गुंड झाल्यानंतर गोंधळ असतो. तो सगळा विचार करू शकतो. असे नाना म्हणाले.
मन्या सुर्वे हा माझा मामेभाऊ - नाना पाटेकर हेही वाचा -पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सहा लाखांच्या मुद्देमालासह 18 अटकेत
दंगलीच्या वेळी सगळ्यात जास्त हिंसक हा सामान्य माणूस असतो. तो आत मधून तुंबलेला असतो. तो कधीच व्यक्त झालेला नसतो. व्यक्त न होणे हा गुन्हा आहे. तो ऐकतो, सहन करतो पण प्रश्न विचारत नाहीत. आपण राजकारण्यांना प्रश्न विचारायला पाहिजेत. आपण त्यांना मत देतो, मग आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पाच वर्षांनी एकदा मत मिळत मग त्याचे धिंदोडे का काढता? का त्याची गाढवावर बसून का धिंड काढता? आमचं मत आहे त्याला तुम्ही कशावर बसवलं आहे. पण तरीही आम्ही गप्प बसतो. या सर्वांचा त्रास होतो, असे नाना म्हणाले.