पुणे- मोकाट कुत्र्याचा बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरात सुळसुळाट झाला असून एकोणीस जणांना चावा घेतला असल्याची घटना घडली. चावा घेतलेल्या जखमींना उपचारासाठी नागरिकांनी तातडीने जिल्हा उपरुग्णालयात दाखल केले आहे.
बारामतीत पिसाळलेल्या कुत्र्याचा सुळसुळाट, 19 जणांचा घेतला चावा
मोकाट कुत्र्याचा बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरात सुळसुळाट झाला असून एकोणीस जणांना चावा घेतला आहे.
व्यक्तीचा चावा घेताना
प्रगतीनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने फिरायला निघालेल्या अनेक नागरिकांना चावा घेतला आहे. माळावरच्या देवीच्या मंदिराजवळ राहणाऱ्या अनंत पाटील यांना पायाला व हाताला चावा घेतला आहे. मएसो शाळेचे सुरक्षा रक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हाताला कुत्र्याने चावा घेतला. प्रगतीनगरला दत्तात्रय भोसले यांच्या मनगटाला चावले आहे. यामध्ये अनेक भागातील नागरिकांचा समावेश आहे.