पुणे - कलियुगात डॉक्टरला खरे तर देवाचे रूप मानले जाते. पण सध्या डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याने देशभरातील डॉक्टरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी १ जुलै रोजी भारतात साजरा करण्यात येणाऱ्या 'डॉक्टर्स दिवस'निमीत्त पुण्यात एका रुग्णालयातील काही डॉक्टरांनी, रुग्ण आणि डॉक्टर यांना उद्देशून 'पेशंट तुला डॉक्टरवर भरोसा नाही का?' हे गाणं तयार केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं चांगलच व्हायरल होत आहे.
पेशंट तुला डॉक्टरवर भरोसा नाही का..? पुण्यातील डॉक्टरांच गाणं सोशल मीडियावर व्हायरल - जागतिक डॉक्टर्स दिवस
१ जुलै हा दिवस भारतात 'डॉक्टर्स डे' म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमत्त पुण्यातील एका रुग्णालयातील काही डॉक्टरांनी, रुग्ण आणि डॉक्टर यांना उद्देशून एक गाणं तयार केले आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.
'डॉक्टर' हा अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी देवदूतच असतो. त्यांच्या अंगभूत कौशल्याने तो अनेकांना जीवनदान देतो. भारतामध्ये १ जुलै हा दिवस 'डॉक्टर्स दिवस' म्हणून साजरा केला जातो. परंतु, मागील काही वर्षात डॉक्टरांवर होणारे हल्ले पाहता डॉक्टर खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यातील बाणेर उमरजी रुग्णालयातील काही डॉक्टरांनी रुग्ण आणि डॉक्टर यांना उद्देशून एक गाणं तयार केल आहे आणि हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. या गाण्याच्या माध्यमातून डॉक्टरांनी पेशंटना आमच्यावर विश्वास ठेवा, प्रत्येक रूग्ण आपल्या उपचाराने बरा व्हावा असेच आम्हाला मनापासून वाटते. आम्ही आपल्या मदतीसाठीच आहोत, असा संदेशही डॉक्टरांनी या गाण्याच्या माध्यमातून सर्वांना दिला आहे.