पुणे -पुरंदर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होत नाही. जिल्हा प्रशासनाने भेदभाव न करता पुरंदर तालुक्याला रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करून द्यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली. शिवतारे यांनी आज जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची भेट घेऊन ही मागणी केली.
माहिती देताना माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हेही वाचा -कोरोनावर 'शतप्लस' औषध गुणकारी असल्याचा बीव्हीजी ग्रुपचा दावा
महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजबद्दल अजिबात रोष नाही. परंतु, प्रशासन मात्र कोरोनाची परिस्थिती व्यवस्थित हाताळताना दिसत नाही. पुरंदर तालुक्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याचा संख्येत वाढ झाली आहे, असे शिवतारे म्हणाले.
सद्यस्थितीत पुरंदरमध्ये कोरोनाचे अठराशे सक्रिय रुग्ण आहेत. आणि आतापर्यंत पुरंदर तालुक्याला केवळ 225 रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले आहेत. लसीकरणाच्या बाबतीतही पुरंदर तालुक्यावर अन्याय झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुरंदर तालुक्यात जास्त असताना केवळ 34 हजार इतकेच लसीकरण झाले आहे. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाने पुरंदर तालुक्यावर अन्याय न करता आरोग्य सुविधा तातडीने पुरवल्या पाहिजेत, अशी मागणीही शिवतारे यांनी केली.
हेही वाचा -बारामतीत रुग्णालयाबाहेर रूग्ण आणि नातेवाईकांसाठी प्रतीक्षा कक्ष