पुणे :देहूतील तुकोबांच्या मंदिरापाठोपाठ आता आळंदीत देखील ज्ञानोबांच्या संजीवन समाधी मंदिरात मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने (Dnyaneshwar Maharaj Sansthan Committee Alandi) पत्रक काढले आहे. जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन देखील कमिटीकडून करण्यात आले आहे. परदेशात सुरू असलेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खबरदारी घेतली (use mask In temple of dyanoba) आहे.
मास्क वापरण्याचे आवाहन : परदेशात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला (temple of dyanoba in Alandi) आहे. चीन, जपान आणि अमेरिकेसह इतर देशांमध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. भारतात देखील कोरोनाचा संभाव्य संकट लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. हे लक्षात घेऊन देवाच्या आळंदीत ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडून मुख्य मंदिरात येत असताना मास्क वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीत जाण्याच टाळावे आणि लहान मुले आणि जेष्ठांनी गर्दीत जाऊ नये, असे पत्रकात म्हटले आहे. मास्क सक्ती नसून केवळ आवाहन असल्याचे मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले (Committee appeal to use mask) आहे.