पुणे Diwali Shopping Of Irshalwadi Children :काही महिन्यांपूर्वी इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. (Nana Bhangire) या दुर्घटनेत बचावलेल्या सर्व लहान चिमुकल्या मुला-मुलींना एकनाथ शिंदे फाऊंडेशन, वंदे मातरम् संघटना (Vande Mataram Organization), राष्ट्र प्रथम ट्रस्ट, युवा वाद्य पथक ट्रस्ट यांच्या पुढाकारातून पुण्यात आणून पुण्यातील दिवाळीची सहल आणि खरेदीची लयलूट करत चिमुकल्यांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, डॉ. नीलम गोऱ्हे या सर्व लहानग्यांना नवीन पोशाख खरेदी करताना स्वतः उपस्थित होत्या. (Sandeep Singh Gill)
बच्चे कंपनीने लुटला खरेदीचा आनंद : शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे आयुष्य अंधकारमय झालेले आहे, अशा आपत्तीग्रस्त चिमुकल्यांना पुण्यात आणून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासारखा दिवाळीचा दुसरा आनंद असू शकत नाही. यावेळी चिमुकल्यांनी लक्ष्मी रस्त्यावर विविध प्रकारचे कपडे, मिठाई खरेदी करत खरेदीचा मनसोक्त आनंद घेतला. सर्वसामान्यांसारखी आपली दिवाळी साजरी होत असल्याचा आनंद या सर्व चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दिवाळी अनोख्या पद्धतीनं साजरी होताना बघून अतिशय समाधान वाटत असल्याचं वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ यांनी सांगितलं.