महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विदेशात राहणाऱ्या भारतीय जोडप्यात घटस्फोटाचे प्रमाण वाढले - परदेशी संस्कृती आणि भारतीय संस्कृती

विदेशात राहणाऱ्या 'एनआरआय' नागरिकांची जीवन जगण्याची शैली खुप वेगळी असते. त्यामुळे भारतीय मुलीसोबत ते फार काळ राहू शकत नाहीत. त्यांचे सामाजिक आयुष्य भारतातील समाजजीवनापेक्षा वेगळे असते. बाहेर जाताना ते आपल्या पत्नीला सोबत घेऊन जाण्यास फारसे उत्साही नसतात. त्यामुळे नवरा बायकोत धुसफूस होत असते.

divorce
विदेशात राहणाऱ्या भारतीय जोडप्यात घटस्फोटाचे प्रमाण वाढले

By

Published : Feb 8, 2021, 12:51 AM IST

Updated : Feb 8, 2021, 3:39 AM IST


पुणे- सध्या घटस्फोटाचे वाढते प्रमाण विवाह संस्थेसाठी धोकादायक बनले आहे. पुण्या मुंबईसारख्या मेट्रो सिटी शहरात घटस्फोटाचे प्रमाण लक्षणीय आहे. म्युच्युअल डिव्होर्स अर्थात परस्पर संमतीने घटस्फोट घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यामध्ये विदेशात राहणाऱ्या जोडप्यांची संख्या लक्षणीय आहे. भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती या दोन्ही मध्ये खूप फरक आहे. त्यामुळे भारतीय मुलींना परदेशात राहताना तेथील समाज जीवनाची जुळवून घेणे कठीण जाते. विशेष म्हणजे एकत्र नांदताना नसेल तेवढी सामंजस्य घटस्फोट घेताना या जोडप्याला करून दाखवले जाते, असे निरीक्षण विवाह समुपदेशकानीं नोंदवले आहे.

भारतीय जोडप्यात घटस्फोटाचे प्रमाण वाढले

त्यामुळे घेतात घटस्फोटाचा निर्णय-

आज कालच्या मुलींना विदेशात जाऊन राहण्याचे मोठे आकर्षण असते. मुलीला विदेशातील नवरा मिळावा असे आकर्षण मुलींच्या आईवडिलांनाही असते. त्यामुळे 'एनआरआय' मुलासोबत लग्न लावून देण्यासाठी आईवडील आग्रही असतात. परंतु विदेशात राहणाऱ्या 'एनआरआय' नागरिकांची जीवन जगण्याची शैली खुप वेगळी असते. त्यामुळे भारतीय मुलीसोबत ते फार काळ राहू शकत नाहीत. त्यांचे सामाजिक आयुष्य भारतातील समाजजीवनापेक्षा वेगळे असते. बाहेर जाताना ते आपल्या पत्नीला सोबत घेऊन जाण्यास फारसे उत्साही नसतात. त्यामुळे नवरा बायकोत धुसफूस होत असते. भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृतीत फार तफावत असल्यामुळे अशा परिस्थितीत जुळवून घेणे कठीण जाते आणि मग हे जोडपे घटस्फोट घेण्यासाठी अर्ज करतात.

वीस वर्षाहून अधिक काळ विवाहसंस्था चालविणाऱ्या अनुपमा कानेटकर सांगतात, परदेशातील स्थळांना भारतीय मुलींचा पाठिंबा असतो. त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला असता असे जाणवले की, तेथे काम करत असताना मिळणारा पगार हा आपल्या पेक्षा जास्त असतो. तेथील समाजजीवनाचे आपल्या मुलांवर भुरळ पडलेली असते. दळणवळणाची साधने आणि प्राथमिक गरजा तेथे अतिशय चांगल्या आहेत. तेथील स्वछता, चकचकीत रस्ते, मोठमोठे रस्ते यांची भुरळ येथील लोकांना असते. या सर्व कारणांमुळे परदेशातील स्थळ भारतीय आई-वडिलांना हवीहवीशी वाटतात.

लग्न झालेले असताना दुसरा विवाह-

अॅड अमोल डांगे सांगतात, एका सर्व्हेनुसार दरवर्षी एनआरआय मुलगा आणि भारतीय मुलगी यांच्यात 224 लग्न होतात. यातील 24 लोकांचे घटस्फोट घेतात. अनेकदा तर परदेशात राहणारी तरुण लग्न झाल्यानंतर पत्नीला भारतातच स्वतःच्या आईवडिलांकडे ठेवतात. काहींचे तर आधी विदेशात लग्न झालेले असते, ते लपवून ते दुसरा विवाह करतात. या गोष्टी जेव्हा उघड होतात तेव्हा घटस्फोटाचा मार्ग ते अवलंबतात. भारतीय कायद्यात अशा प्रकार होणाऱ्या घटस्फोटासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मुलगा एनआरआय आहे म्हणून आईवडिलांनी लग्न लावून न देता त्या मुलाची कौटुंबिक पार्श्वभूमी तपासावी आणि नंतरच लग्न लावून द्यावे.

Last Updated : Feb 8, 2021, 3:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details