महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनास्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न- महापौर माई ढोरे - Pimpri chinchwad mayor mai dhore on corona

पिंपरी चिंचवड शहरासंबंधी माहिती देताना महापौर ढोरे म्हणाल्या की, महापालिकेच्या माध्यमातून कोविड 19 संबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी उपयुक्त असलेल्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनच्या तुटवडा पडत असल्याचाही त्या म्हणाल्या.

पिंपरी चिंचवडमध्ये जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीचे आयोजन
पिंपरी चिंचवडमध्ये जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीचे आयोजन

By

Published : Sep 28, 2020, 11:05 AM IST

पुणे- विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी शहराच्या कोरोना परिस्थितीची माहिती दिली.

पिंपरी चिंचवड शहरासंबंधी माहिती देताना महापौर ढोरे म्हणाल्या की, महापालिकेच्या माध्यमातून कोविड 19 संबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी उपयुक्त असलेल्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनच्या तुटवडा पडत असल्याचाही त्या म्हणाल्या.

तसेच कोविड 19 वर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड शहरात सध्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत शहरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. यासाठी प्रत्येक प्रभागानुसार स्वयंसेवक घरांना भेटी देत असून नागरिकांचा या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

त्यानंतर अजित पवारांनी जम्बो कोविड सेंटरची पाहणी करत तिथल्या रुग्णांशी व्हिडीओच्या माध्यमातून सवांद साधला. जम्बो कोविड सेंटरमध्ये सध्या 300 रुग्ण आहेत. तर अॅटो क्लस्टरमध्ये असलेल्या कोविड सेंटरमध्ये 30 रुग्ण असून 3 व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती ढोरे यांनी दिली.

या बैठकीला कामगार व राज्य उत्पादन मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त सौरभ राव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर ,पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details