पुणे- दौंड तालुक्यात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ‘मेडिकल ग्रेड ऑक्सिजन कॉन्संट्रेटर’ यंत्रणा उभारण्यात यावी, अशी विनंती आमदार राहुल कुल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दौंड उपजिल्हा रुग्णालयात ४१ लाख रुपये खर्चकरून ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले आहेत. दौंड तालुक्यातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
आमदार राहुल कुल यांनी केली होती मागणी -
कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढले असून, सर्वत्र कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल होत असल्याने यवत ग्रामीण रुग्णालय किंवा दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन पुरवठा करणारी मेडिकल ग्रेड ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली होती. याबाबतचे एक पत्र आमदार राहुल कुल यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना १८ एप्रिलला दिले होते.
दौंड उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन यंत्रणा उभारली जाणार -
आमदार राहुल कुल यांनी केलेल्या या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे ४१ लक्ष रुपये खर्चाची मेडिकल ग्रेड ऑक्सिजन काँन्संट्रेटर (Medical Grade Oxygen Concentrator) यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले आहेत. लवकरात लवकर ही ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित करून, ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न राहिल, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.