महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गर्भवती मातांसह बालकांचे लसीकरण : लॉकडाऊनकाळातही आरोग्य यंत्रणेकडून मोहिम जोरात - पुण्यात लॉकडाऊनचा लसीकरणावर परिणाम

राज्यात लॉकडाऊनची अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने तसेच कोविड-19 संसर्गाच्या भीतीमुळे गर्भवती महिला, बालकांचे लसीकरण करून घेण्याचे प्रमाण घटल्याचे दिसून येते आहे.

लसीकरण
लसीकरण

By

Published : May 19, 2020, 8:25 PM IST

Updated : May 23, 2020, 5:40 PM IST

पुणे -कोरोना आजारामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले आहे. यातच राज्यातील कोरनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे गर्भवती माता व बालकांच्या लसीकरणावर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाने या माध्यमातून तसेच आशा वर्कर यांच्या माध्यमातून गर्भवती महिला तसेच नवजात शिशू यांना लसीकरण सोय उपलब्ध करण्यात येते. विविध प्राणघातक आजाराना प्रतिबंध करण्यासाठी हे लसीकरण तसेच त्यांना पोषक आहर देणे अत्यावश्यक असते. याचा आढावा घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला आहे.

लसीकरण कार्यक्रमावरील लॉकडाऊनचा परिणाम रोखण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन

कोरोना संकटातही लसीकरणाची मोहीम जोरात, रायगडमध्ये 400 आरोग्यसेविका पार पाडत आहेत जबाबदारी

कोरोनाच्या संकटात सर्व प्रमुख यंत्रणा स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. आरोग्य यंत्रणेवर तर सद्या प्रचंड ताण आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह आरोग्यसेविकाही या युद्धात जिकरीचे काम करत आहेत. जिल्ह्यातील 400 आरोग्यसेविका, 1 हजार 760 आशा सेविकाच्या मदतीने लसीकरणाचे काम करत आहेत. त्यांच हे काम फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून सुरू आहे. त्यांच्या या कामामुळे लसीकरणापासून जिल्ह्यातील एकही बालक अथवा गरोदर माता वंचित राहिलेले नाही.

लसीकरण

जिल्ह्यात 288 उपकेंद्र असून यामध्ये 245 कायमस्वरूपी तर 147 कंत्राटी आरोग्य सेविका काम करत आहेत. या आरोग्य सेविकांना लसीकरण कामात जिल्ह्यातील 1 हजार 760 आशा सेविकाची मदत मिळते. नवजात बालकांपासून ते 16 वर्षे वयाच्या मुलांना बीसीजी, पोलिओ, रोटा, एमआर, टीटी, व्हिटॅमिन ए, आय पीव्ही, हिपाटेटीस बी, टीडी या लसी दिल्या जात आहेत. तर गरोदर मातांना टीडीची लस दिली जात आहे. तसेच यावेळी आरोग्य सेविका आणि आशा वर्कर कोरोनाबाबतीत जनजागृतीही करत आहेत.

कोरोना संकटातही लसीकरणाची मोहीम जोरात

लसीकरण कार्यक्रमावरील लॉकडाऊनचा परिणाम रोखण्याचे पुणे जिल्हा प्रशासनाचे नियोजन

पुणे जिल्ह्यात लॉकडाऊनची अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने तसेच कोविड-19 संसर्गाच्या भीतीमुळे हे लसीकरण करून घेण्याचे प्रमाण घटल्याचे दिसून येते आहे. अर्थात सरकारी आरोग्ययंत्रणेकडून लसीकरणात खंड न पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

एकंदरीतच लॉकडाऊन काळात लसीकरण ठराविक दिवशी उपलब्ध करून देत नियोजन केले जात असून ज्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य प्रकारे सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे. पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात आशा वर्करांची मदत लसीकरणासाठी घेतली जाते आहे. तसेच या भागातील नागरिक गर्भवती महिलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष पुरवण्याबाबत जिल्हा प्रशासनाला आवाहन करत आहेत.

दौंड तालुक्यातही गर्भवती माता आणि नवजात शिशूंच्या लसीकरणाचे नियोजन योग्य प्रकारे होत असल्याचे आरोग्य अधिकारी सांगतात, तर बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालय आणि या रुग्णालयाच्या अखत्यारीतील तांदुळवाडी व अनंत आशानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणाऱ्या गरोदर माता व बालकांच्या नियमित लसीकरणावर कोरोनामुळे घट झाल्याचे दिसत आहे. वयोवृद्ध, लहान मुले व गरोदर महिलांना कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याने गरोदर महिलांनी लसीकरण करून घेणे टाळल्याचे दिसून येत आहे.

टाळेबंदीत मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये कमी प्रमाणात लसीकरण झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मार्चमध्ये ६७३ बालकांनी लसीकरण केले होते. तर एप्रिलमध्ये हेच प्रमाण २२८ वर आल्याचे दिसते. तसेच मार्चमध्ये ६६४ गरोदर महिलांनी लसीकरण केले होते. तर एप्रिलमध्ये हेच प्रमाण ५९३ इतके होते. दरम्यान, टाळेबंदीतही गर्भवती माता व बालकांची नियमित तपासणी व लसीकरण सुरू होते. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक बालकाला व गरोदर महिलांना तपासणी करून लसीकरण केले जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

सकस आहार पुरविणाऱ्या आशा वर्कर

रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात अंगणवाडी सेविका, मदतनीस घरपोच पुरवातयत पोषण आहार

जिल्ह्यात कर्जत तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण हे इतर तालुक्यांपेक्षा जास्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू असून शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे स्तनदा माता, गरोदर माता आणि कुपोषित बालकांना अमृत आहार पोहोचवणे जिकरीचे झाले होते. मात्र, यावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील स्तनदा माता आणि कुपोषित बालकांना घरपोच डॉ. अब्दुल कलाम अमृत पोषण आहार पोहोचवत आहेत.

कर्जत तालुक्यातील 330 अंगणवाड्या बंद झाल्या आहेत, असे असले तरी आदिवासी भागात 135 अंगणवाड्या आहेत. याठिकाणी आदिवासी भागातील कुपोषित बालके, स्तनदा, गरोदर माता यांना पोषण आहार दिला जातो. या भागात कुपोषण जास्त असल्याने शासनाने अतिरिक्त आहार देण्याचे ठरविले. त्यानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या स्तनदा माता, गरोदर माता यांना धान्याच्या स्वरुपात सकस आहार, तर कुपोषित बालकांना शिजवलेला पोषण आहार, अंडी आणि केळी याचे वाटप घरोघरी जाऊन करत आहेत.

Last Updated : May 23, 2020, 5:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details