पुणे - चाकण औद्योगिक वसाहतीतून परप्रांतीय कामगारांना पुन्हा त्यांच्या राज्यात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी राजगुरुनगर प्रशासनाकडून एसटी बसची व्यवस्था करण्यात आलीय. या कामगारांना प्रवासादरम्यान लागणारे खाद्यपदार्थ देखील पुरवण्यात आले आहेत. यामध्ये चटणी, भाकरी, गूळ, शेंगदाणे अशा विविध पदार्थांचे 500 पॅकेज अतुल देशमुख यांच्या वतीने वाटण्यात येत आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावर परतीचा प्रवास करणाऱ्या मजूरांना खाद्य किट्सचे वाटप - lockdown in pune
चाकण औद्योगिक वसाहतीतून परप्रांतीय कामगारांना पुन्हा त्यांच्या राज्यात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी राजगुरुनगर प्रशासनाकडून एसटी बसची व्यवस्था करण्यात आलीय.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात परराज्यातील असंख्य कामगार परतीच्या प्रवासाला लागले आहे. या प्रवासादरम्यान कामगारांना आठ ते दहा दिवस टिकणारे खाद्यपदार्थ पुरवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी कामगार अडकून पडल्याने त्यांच्या दोन वेळ जेवणाचे देखील हाल होत आहेत. अशातच उद्योगधंदे बंद झाल्याने मजूरी मिळणे देखील कठीण झाले. त्यामुळे कामगारांना उपासमारीचा सामना करावा लागला. आता जेवणासाठी देखील पैसे नसल्याने देशमुख यांच्या वतीने पुरवण्यात आलेल्या अन्नाच्या पॅकेट्सचा उपयोग होणार आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर कामगार मोठ्या संख्येने परराज्यात परतीचा प्रवास करण्यासाठी खेड तालुक्यातून एसटी बसची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. दररोज 500 पेक्षा जास्त कामगार पुणे-नाशिक महामार्गावरुन परतीचा प्रवास करत आहेत. त्यांच्या या प्रवासाला चटणी-भाकरी आणि गूळ-शेंगदाणे या पदार्थांचा हातभार लागणार आहे.