महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 13, 2021, 9:27 AM IST

ETV Bharat / state

संत ज्ञानेश्वर महाराज वारी सोहळ्यावरून वाद; आळंदीकरांना पायी वारी नको

संत ज्ञानेश्वर महाराज वारी सोहळा कसा व्हावा यावरून वारकरी व गावकरी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. तर कोरोना संकट अजून दूर झालेले नसल्याने यावर्षीही मागील वर्षीप्रमाणे मोजक्याच भाविकांत आळंदी, पंढरपूर पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज वारी सोहळ्यावरून वारकरी व गावकऱ्यांत वाद
संत ज्ञानेश्वर महाराज वारी सोहळ्यावरून वारकरी व गावकऱ्यांत वाद

पुणे- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोना महामारीचे सावट आहे. यामुळे मागील वर्षी झालेल्या चुका टाळून, यावर्षीही माऊलींचा पालखी सोहळा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा व्हावा, अशी मागणी आळंदी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. तर वारकरी पालखी सोहळा पायी व्हावा यावर ठाम आहेत. गावकरी व वारकरी यांच्यात वाद निर्माण झाला आहे.

शासनाच्या निर्णयाशी सहमत आळंदी ग्रामस्थ-

मागील वर्षभरात कोरोनाने मोठे संकट लोकांसमोर उभे केले आहे. यात अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना संकट अजूनही पुर्णपणे संपलेले नाही. गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार जास्त होतो. त्यामुळे गर्दी नियंत्रित राहावी व पालखी सोहळ्यामुळे कोरोना संकट वाढु नये, म्हणून यावर्षीही शासनाने आळंदी पंढरपूर पालखी सोहळा मोजक्याच भाविकांत साजरा करावा, अशी मागणी आळंदी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. तर वारकरी पालखी सोहळा पायी व्हावा यावर ठाम आहेत. परंतु पालखी सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत व बसने नेण्याचा निर्णय शासनाने यापुर्वीच घेतला आहे. शासनाच्या या निर्णयात ग्रामस्थांची सहमती आहे.

'पायी वारीचा हट्ट सोडावा'

पायी वारीचा हट्ट सोडावा, तसेच संतांची शिकवण सामाजिक आरोग्य, सलोखा, विश्वशांतीच विचार करून ही मागणी करण्यात आली आहे. सोहळा बसने प्रवास करतांना प्रथा परंपरांचे पालन व्हावे. तसेच मागील वर्षी प्रमाणे वारी हून परत आल्यानंतर आपआपल्या मंदिरांत धार्मिक कार्यक्रम करावे. तसेच शासनाचे कोरोंना संदर्भातील नियम, सूचना, आदेशांचे पालन करीत पालखी सोहळा साजरा व्हावा, यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आल्याचे आळंदी ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा -वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावाचा विचार व्हायला हवा होता; राज्य सरकारच्या निर्णयावर एकनाथ खडसेंची नाराजी

ABOUT THE AUTHOR

...view details