पुणे:मारुंजीच्या डोंगरावर एकूण 41 कोरीव पटखेळ सापडले आहेत. ट्रेकर मारुती गोळे हे डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले. (Went for trekking in the mountains) तेव्हा त्यांना तीन पटखेळ दिसले. त्यांनी फेसबुकवर पोष्ट करत इतिहासाची जाण आणि अभ्यास करत असलेल्या व्यक्तींना पोस्ट केली.
An ancient relic : पुण्यात डोंगरावर आढळला 41 पटखेळांचा प्राचीन ठेवा - डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले
आयटी हब असणाऱ्या हिंजवडी (IT Hub Hinjewadi) जवळील मारुंजीच्या डोंगर परिसरातील दगड आणि खडकांवर कोरलेले प्राचीन पटखेळ (Discovery Of 41 Ancient Games) आढळले आहेत. ही बाब ट्रेकर मारुती गोळे यांच्यामुळे समोर आली. सोज्वळ साळी आणि ऋषी राणे यांनी मारुंजी येथे पाहणी केली असता 41 पटखेळ सापडले आहेत. पैकी एक भारतातील सर्वात मोठा पटखेळ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. वाघबकरी आणि मंकळा हे दोन प्रकार असून ते कोणत्या शतकातील आहेत याचा अभ्यास सुरू असल्याची माहिती साळी आणि राणे यांनी दिली.

सोज्वळ आणि ऋषी हे दोघे ही मारुंजी च्या डोंगरावर आले. ते नाशिक आणि मुंबई चे राहणार असून केवळ इतिहासाचा अभ्यास आणि आवड असल्यामुळे त्यांनी पुण्यातील मारुंजी चा डोंगर गाठला. तिथे त्यांनी आणखी परिश्रम घेतले तेव्हा त्यांना वेगवेगळ्या दगड आणि खडकांवर तब्बल 41 पटखेळ सापडले (Discovery Of 41 Ancient Games) . त्यात, वाघबकरी आणि मंकळा असे खेळांचे प्रकार आहेत. पैकी, एक सर्वात मोठा असून सहा फूट लांब आणि सहा फूट रुंद असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतातील सर्वात मोठा हा पटखेळ असल्याचा दावा ऋषी आणि सोज्वळ यांनी केला. या पटखेळांना इतिहासात वेगवेगळी नाव आहेत. हा खेळ कसा खेळायचा याचे नियम सर्वांचे सारखे असावेत असे सांगितले जाते. मारुंजी च्या डोंगरावर एकाच प्रकारची लोक येत असतील ते या ठिकाणी खेळ खेळत असावेत किंवा इथे काही प्रथा असावी जेणेकरून लोक तो खेळ खेळत असावीत. असा अंदाज दोघांनी व्यक्त केलाय. तो, अभ्यातून अधिक स्पष्ट होईल. पण हा इतिहासकालीन ठेवा जपून ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.