पुणे- राज्यातल्या कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणामध्ये पुणे शहर प्रमुख आहे. पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा वेग चिंताजनक आहे. केंद्रीय पथकाच्या निरीक्षणानुसार शहरातल्या कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 7 दिवसात दुप्पट होत असल्याचे नुकतेच स्पष्ट करण्यात आले होते. एकीकडे पुणे शहरातील ही चिंताजनक बाब असताना दुसरीकडे गेल्या काही दिवसात एक समाधानकारक बाबही समोर आली आहे. गेल्या 7 दिवसापासून पुण्यात दररोज 50 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत.
दिलासादायक..! पुण्यात गेल्या 7 दिवसात दररोज 50 पेक्षा जास्त जण कोरोनामुक्त - Corona Virus
पुण्यात एकीकडे दिवसाला साधारण 80 ते 90 रुग्ण पुणे परिसरात समोर येत असताना दिवसाला 50 पेक्षा जास्त रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात आहेत.
एकीकडे दिवसाला साधारण 80 ते 90 रुग्ण पुणे परिसरात समोर येत असताना दिवसाला 50 पेक्षा जास्त रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात आहेत. आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनासाठी ही मनोबल वाढवणारी बाब आहे. एकंदरितच गेल्या 7 दिवसात शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णच्या तुलनेत अॅक्टिव्ह रुग्णाची टक्केवारी कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
28 एप्रिलला एकूण कोरोनाबाधित रुग्ण संख्येच्या 79 टक्के रुग्ण अॅक्टिव्ह होते. मात्र, 6 मे च्या आकडेवारीनुसार एकूण बाधितांपैकी 65 टक्के रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यामुळे ही बाब समाधान कारक आहे. गेल्या 6 दिवसातील प्रत्येक दिवसाला पूर्ण बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्याची संख्या.
- डिस्चार्ज मिळालेल्याची संख्या -
- 1 मे रोजी 51 रुग्णांना डिस्चार्ज
- 2 मे रोजी 53 रुग्णांना डिस्चार्ज
- 3 मे रोजी 55 रुग्णांना डिस्चार्ज
- 4 मे रोजी 50 रुग्णांना डिस्चार्ज
- 5 मे रोजी 52 रुग्णांना डिस्चार्ज
- 6 मे रोजी 52 रुग्णांना डिस्चार्ज