महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

८७ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, स्थानिकांनी फुलांचा वर्षावात केलं स्वागत - 87 year old men beat corona

शहरातील ८७ वर्षीय आजोबांनी कोरोनाविरुद्ध यशस्वीपणे लढा दिला आहे.

discharge of 87 year old who beat corona in pune
८७ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, स्थानिकांनी फुलांचा वर्षावात केलं स्वागत

By

Published : May 15, 2020, 1:07 PM IST

पुणे- शहरातील ८७ वर्षीय आजोबांनी कोरोनाविरुद्ध यशस्वीपणे लढा दिला आहे. त्यांनी केवळ कोरोनालाच हरवलं नाही तर इतर रुग्णांना आणि तरुणांनाही जगण्याचा मंत्र दिला आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्या आजोबांचे स्वागत स्थानिकांनी फुलांचा वर्षावात केलं.

नाना पेठ परिसरातील एका ८७ वर्षीय आजोबांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. यात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांना डिस्चार्ज दिला. तेव्हा त्या आजोबांचे स्वागत स्थानिक नागरिकांनी फुलांच्या वर्षावात केले.

८७ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात...

मागील आठ्वड्याभरापासून पुणे शहरात कोरोनामुक्तांचा आकडा वाढत आहे. यामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे. आत्तापर्यंत शहरात सुमारे दीड हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दररोज शंभरहून अधिकच्या सरासरीने रुग्ण बरे होत आहेत.

हेही वाचा -पुण्यात आतापर्यंत 1 हजार 486 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

हेही वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्तांकडून सन्मान

ABOUT THE AUTHOR

...view details