पुणे -ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होईल, असा कुठलाही पदार्थ आम्ही चहामध्ये वापरत नाही. अन्न व औषध प्रशासनाने आमच्या कारखान्याला दिलेल्या भेटीमध्ये कुठलाही घातक पदार्थ त्यांना आढळून आला नाही. आमची सर्व दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे स्पष्टीकरण येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी दिले.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर येवले चहामध्ये 'मेलामाईन' नावाचा घातक पदार्थ वापरला जात असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, आमच्या चहामध्ये असा कुठलाही पदार्थ वापरला जात नाही. आम्हाला ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार नाही. अन्न व औषध प्रशासनाला आमच्या पॅकिंग संदर्भात काही त्रुटी आढळल्या. त्याची पूर्तता आम्ही केली आहे, अशी माहिती नवनाथ येवले यांनी दिली.