पुणे - कोंढव्यात संरक्षण भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेबद्दल आपल्याला दुःख झाले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. या सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोंढवा भिंत दुर्घटनेची सखोल चौकशी करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
घटनास्थळाला पुण्याचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, स्थानक आमदार योगेश टिळेकर, महापौर मुक्ता टिळक यांनी भेट दिली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले् आहे.
पुणे
15 कामगारांचा नाहक बळी -
पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आले आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाची टीम, एनडीआरएफची टीम बचावकार्य राबवत आहे.
घटनास्थळाला पुण्याचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, आमदार योगेश टिळेकर, महापौर मुक्ता टिळक यांनी भेट दिली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.