पुणे -शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथून श्रीक्षेत्र तुळजापूर जागृत पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले. गावातील नागरिकांनी पायी दिंडीचे स्वागत केले.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला (रविवार) देशभरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात घराघरात घटस्थापना केली जाते. देवीच्या आगमनानिमित्त गावात भक्तीमय वातावरण आहे. नऊ दिवस तरुणाई, महिला, आणि जेष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा करणार आहेत.