पुणे-पाहूनी समाधीचा सोहळा । दाटला इंद्रायणीचा गळा॥
बाळ सिद्ध पाहता चिमुकला। कुणी गहिवरे कुणी हळहळे ।
भाळी लावून चरण रजाला चरणावरी लोळला॥
चोखा गोरा आणि सावता ।
निवृत्ती हा उभा एकटा ।
सोपानासह उभी मुक्ता अश्रूपुर लोटला॥
खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावच्या जिल्हा परिषद शाळेत भक्तीचा वारसा जपत चिमुकल्या मुलांनी विठ्ठल रुख्मिणी, ज्ञानदेव, निवृती सोपान मक्ताबाईची वेशभुषा करुन संपुर्ण गावातून दिंडीसोहळा काढला. तसेच विठुमाऊलीच्या नामाचा जयघोष करत भक्तीमय वातावरणात चिमुकल्यांसह शिक्षकांनीही ठेका धरला.
टाकळकरवाडी गावच्या जिल्हा परिषद शाळेत भक्तीचा वारसा जपत चिमुकल्या मुलांनी संपुर्ण गावातून दिंडीसोहळा काढला. गावातील विठ्ठल मंदीरापर्यत पायी दिंडी काढण्यात आली. संतांच्या अभंगवाणीने दिंडीची सुरुवात झाली. गवळणीतून विठ्टलवाणी म्हणत चिमुकल्या मुलांसह शिक्षक, पालक भक्तीरसात न्हाहून गेले होते. चिमुकल्या मुलांची संताची वेशभुषा प्रत्येक नागरिकाचे लक्ष वेधुन घेत होती.
आषाढीवारीची पालखी पंढरीच्या दिशेने जात असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी काढलेला हा दिंडी-पालखी सोहळा कौतुकास्पदच म्हणावा लागेल. म्हणुनच 'मुले हि देवाघरची फुले' असे म्हटले जाते.