महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डिंभे, भामा-आसखेड धरण ओव्हरफ्लो; घोडनदी, भामानदीत पाण्याचा विसर्ग सुरू

गेल्या वर्षी उत्तर पुणे जिल्हा दुष्काळी संकटात सापडला होता. शेतकरी पाण्यासाठी वणवण भटकंती करत होता. एवढेच नाही, तर प्राण्यांचेही पाण्यासाठी प्रचंड हाल झाले. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डिंभे, भामा-आसखेड धरण ओव्हरफ्लो

By

Published : Aug 4, 2019, 12:01 AM IST

पुणे - गेल्या पंधरा दिवसांपासून खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात पावसाची दमदार बॅटींग सुरू आहे. कुकडी प्रकल्पातील सर्वांत मोठे असलेले डिंभे धरण व खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. डिंभे धरणातून घोडनदीत 16 हजार क्युसेक्सने तर भामा-आसखेड धरणातून भामानदीत 5 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देणात आला आहे.

डिंभे, भामा-आसखेड धरण ओव्हरफ्लो

गेल्या वर्षी उत्तर पुणे जिल्हा दुष्काळी संकटात सापडला होता. शेतकरी पाण्यासाठी वणवण भटकंती करत होता. एवढेच नाही, तर प्राण्यांचेही पाण्यासाठी प्रचंड हाल झाले. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डिंभे धरणातील पाणी आंबेगाव तालुक्यात शेती व पिण्यासाठी वापरण्यात येते. तर भामा-आसखेड धरणाचे पाणी पुणे, चाकण आणि आळंदीत पिण्यासाठी वापरले जाणार असल्याने दुष्काळी संकटापासून दिलासा मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details