पुणे - शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक ते सातव्यांदा आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार, असा राजकीय प्रवास करणाऱ्या दिलीप वळसे-पाटील यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. खाते वाटपानंतर दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार असल्याची प्रतिक्रिया वळसे-पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारा विभाग आहे. येणाऱ्या काळात या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून सरकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वळसे-पाटील यावेळी म्हणाले. कामगार आणि उद्योग मालकांचा एकमेकांमध्ये समन्वय साधून उद्योगांना चालना देण्याचा आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -'सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी गरज पडल्यास मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन'