पुणे - आधीच कोरोनामुळे हातचे काम गेल्याने नागरिक आर्थिक अ़डचणींना तोंड देत आहेत. तर, आता राज्यातील आदिवासी व डोंगराळ भागात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मोलमजुरीचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. आता राज्य सरकारने रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्याचे आदेश दिले आहे. यामध्ये वैयक्तीक लाभाची कामे मंजुर न करता सार्वजानिक स्वरुपाची मोठी कामे हातात घेत, आदिवासी व डोंगराळ भागातील आदिवासी नागरिकांसाठी कायमस्वरुपी काम उपलब्ध होण्यावर प्रशासनाने भर द्यावा, अशा सूचना कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या.
मनरेगातून आदिवासींना कायमस्वरुपी कामे उपलब्ध करून द्या - दिलीप वळसे-पाटील हेही वाचा -परतीचा पाऊस...राज्यभरात विविध ठिकाणी वीज पडून अकरा जणांचा मृत्यू
देशासह संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय सरकारने घेतला. या लॉकडाऊनमुळे रोगाची तीव्रता कमी झाली नाही. मात्र जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. अशातच आता परतीच्या पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांना मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. मात्र, पुर्वीसारखे मात्र हाताला काम मिळत नसल्याने नागरिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे त्यांच्या हाताला कायमस्वरुपी काम मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. आज पुण्यात जिल्हाधिकारी, प्रांतधिकारी,तहसिलदार गटविकास आधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.
सरकारने प्रशासनाकडुन मनरेगाची कामे तातडीने हातात घेऊन आदिवासी भागात रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरु करत असताना आदिवासी भागात वैयक्तिक लाभाची कामे सुरु केली जात असुन मोलमजुरी करणा-यांनी रोजगार उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आदिवासी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. या तक्रारी लक्षात घेऊन आदिवासी भागातील शेतकरी व मोलमजुरी करणा-यांना कायम स्वरुपी हाताला काम मिळेल यासाठी प्रशासनाने काम करावे असे आदेश कामगारमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी दिले.