महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 14, 2020, 4:17 PM IST

ETV Bharat / state

बांधकाम कामगारांना मिळणार मदतीचा दुसरा हप्ता; कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटलांची घोषणा

सध्या राज्यातील लॉकडाऊमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. अनेक उद्योग आणि व्यवसाय हळूहळू सुरू होत आहेत. मात्र, इमारत व इतर बांधकाम व्यवसाय अद्यापही पूर्ववत सुरू झालेला नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन या कामगारांना अर्थसहाय्य दिले जात आहे.

Dilip Walse-Patil
दिलीप वळसे-पाटील

पुणे - राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेत तीनशे कोटींचे रोख अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील तब्बल 10 लाख बांधकाम कामगारांच्या खात्यावर प्रत्येकी 3 हजार रुपये जमा होणार आहे. हा अर्थसहाय्य योजनेतील दुसरा हप्ता असल्याची माहिती राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

बांधकाम कामगारांना मिळणार मदतीचा दुसरा हप्ता

महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना हे तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असणाऱया राज्यातीला बांधकाम कामगारांना या अर्थसहाय्याने दिलासा मिळणार असल्याचा विश्वास वळसे-पाटलांनी व्यक्त केला.

सध्या राज्यातील लॉकडाऊमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. अनेक उद्योग आणि व्यवसाय हळूहळू सुरू होत आहेत. मात्र, इमारत व इतर बांधकाम व्यवसाय अद्यापही पूर्ववत सुरू झालेला नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदीत बांधकाम कामगारांना 3 हजार रुपयांच्या मदतीचा दुसरा हप्ता मंजूर करण्यात आल्याचे वळसे-पाटील म्हणाले.

कोरोनाचा प्रादुर्भावाच्या कालावधीत 2 हजार रुपयांच्या मदतीचा पहिला हप्ता एप्रिल 2020 मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै 2020पर्यंत राज्यातील 9 लाख 14 हजार 748 बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. यासाठी आतापर्यंत 183 कोटी रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details