महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना नियमांचे पालन करा; औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याना गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा इशारा - Pune MIDC

Dilip Valse Patil gives warning to MIDC companies about following covid rules
कोरोना नियमांचे पालन करा; औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याना गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा इशारा

By

Published : May 2, 2021, 12:46 PM IST

Updated : May 2, 2021, 1:55 PM IST

12:35 May 02

औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याना गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा इशारा

पुणे- जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यामुळे कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. या कंपन्यामधे निर्बंध पाळण्याची जबाबदारी त्या मालकांची आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या रोखण्यासाठी राज्याच्या ग्रहमंत्र्यांनी आंबेगाव तालुक्यात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. ग्रामीण भागात सुरू असलेल्या औद्योगिक वसाहतीत उद्योगपती किंवा प्रमुख आहेत, त्यांनी सगळे निर्बंध पाळले पाहिजेत, बाकी कामगारांची सोय त्यानी केली पाहिजे, असे  यावेळी बोलतांना ते म्हणाले. या आढावा बैठकीत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्यधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

Last Updated : May 2, 2021, 1:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details