पुणे : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गारपीठ झाली आहे. शेतकऱ्यांना कोणतीही मदत न करता पंचनामे देखील झाले नाही. यावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, कृषीमंत्र्यांना अजिबात गांभीर्य राहिलेला नाही. त्यांना तो विषय समजत नाही का?, हे देखील माहीत नाही, अशी टिका यावेळी वळसे पाटील यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केली आहे. पुण्यातील बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट त्यांनी आज भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठं नुकसान झाले आहे. सरकारच्या बाजूने पंचनामे होत नाहीये. कर्मचाऱ्यांच्या संपाचे दाखले दिले जात आहे. हे चुकीचे असून याबाबत आम्ही उद्या अधिवेशनात हा प्रश्न उठवू. शेतकऱ्याचे पंचनामे होऊन त्यांना मदत मिळायला हवी अशी आमची मागणी आहे. आज आपण पाहिले तर सर्व सरकारी यंत्रणा ठप्प झाली आहे. तालुक्यातील आमदार, खासदार हे आपल्या भागात पाहणी करत आहे. माझ्याही मतदार संघात गारपीठ झाली असून तिथे ही आमच्याकडून पाहणी करून शेतकऱ्याने धीर देण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
सरकारकडून फक्त जाहिरातबाजी :गुढपाडव्याच्या निमित्ताने सरकारकडून शिधा वाटप करण्यात येणार होती. अजूनही ती देण्यात आलेली नाही. यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार ही घोषणा करणार सरकार आहे. आज आपण पाहिले तर शेवटच्या माणसाला जी मदत मिळायला हवी ती मदत मिळताना दिसत नाही. सरकारकडून फक्त जाहिरातबाजी सुरू आहे.अस देखील यावेळी पाटील म्हणाले.