विरोधी पक्षनेते अजित पवार पुणे : सडेतोड आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे नेहेमीच चर्चेत असतात. कधी पक्षातील कार्यकर्त्यांना भर सभेत सुनावणे तर कधी दौऱ्यात असताना अधिकारांना खडेबोल सुनावणे यामुळे अजित दादा हे नेहेमीच चर्चेत असतात. पुण्यात एका दुचाकीच्या शो रूमच्या उद्घाटनाच्यावेळी अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे अजित दादा पुन्हा एका चर्चेत आले. अजित पवार यांच्या बोलण्याने उद्घाटनाला आलेल्या नागरिकांना हसू आले.
दुचाकीमुळे झाला आमदार : पुण्यातील कोथरूड परिसरात केळेवाडी येथे दुचाकी गाड्याच्या शोरूमचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कसबा आमदार रवींद्र धंगेकर उपस्थितीत होते. दुचाकी गाड्या शोरुममध्ये पाहत असताना एका कार्यकर्त्याने अजित पवार यांना दुचाकीवर बसायला सांगितले. तेव्हा अजित पवार यांनी धंगेकर यांच्याकडे बघून सांगितल की, हा आहे हा दुचाकीवर बसूनच आमदार झाला आहे. रवींद्र धंगेकर यांना गाडीवर बसवून चक्कर मारा असे अजित पवार यांनी शोरुम मालकांना सांगितले.
अजित पवार यांची टोलेबाजी :अजित पवार हे त्यांच्या स्पष्ट बोलण्याच्या पद्धतीमुळे नेहमी चर्चेत असतात. पत्रकारांशी सवांद साधत असताना असो, किंवा पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकी असो दादा योग्य वेळी अजून टोलेबाजी करतात. अजित पवारांची टोलेबादजी ही फक्त विरोधकांवरच असते असे नाही तर ते कधी-कधी कार्यकर्त्यांवर आणि पत्रकारांवर देखील असते.
दादा पादा : शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या निर्णयावर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांनी राजीनामा परत घ्यावा,अशी मागणी पक्षातून होत होती. त्यावेळी शरद पवार यांनी आपला अंतिम निर्णय घेण्यासाठी दोन-तीन दिवसाचा वेळ कार्यकर्त्यांकडे मागितला होता. त्यावेळी शरद पवार यांचा निर्णय पत्रकारांना सांगताना अजित पवारांनी एक मजेशीर डॉयलॉग बोलला होता. पत्रकार अजित पवार बोलत असताना मध्येच दादा म्हणत होता तेव्हा अजित पवार त्याला थांब रे दादा पादा असा डॉयलॉग दिला होता.
हेही वाचा -
- Devendra Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत प्रशासन पोहोचवण्याचा प्रयत्न करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Sanjay Raut visit to Nanded : लोकसभेत जिंकलेल्या 19 जागांवर शिवसेनेचाच उमेदवार असेल -संजय राऊत
- Serious Allegations Against Thackeray : ठाकरे कुटुंबाकडून वसूल केली जाते खंडणी, भाजपच्या 'या' आमदाराने केला मोठा गौप्यस्फोट