बारामती (पुणे) - धनगर समाज आरक्षणासह युती सरकारने अनुसूचित जाती-जमातीच्या दिलेल्या 22 सवलती तत्काळ लागू कराव्यात. तसेच मेंढपाळांवरील हल्ले थांबवण्यासाठी त्यांना शस्त्र परवाने द्यावेत, अशा प्रकारच्या मागण्यांसंदर्भात आज (दि. 27 सप्टें.) सर्वपक्षीय धनगर समाजातील नेत्यांची धनगर समाज ऐक्य परिषद पार पडली. सरकाने आठ दिवसाने धनगर आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास राज्यभर उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
...अन्यथा धनगर समाज राज्यात उग्र आंदोलन करेल - dhangar community news
धनगर समाज ऐक्य परिषद भिगवण येथे झाली. यावेळी राज्याने येत्या आठ दिवसांत धनगर समाजाबाबतच्या आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास राज्यात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने झाला.
छायाचित्र
Last Updated : Sep 27, 2020, 7:31 PM IST