महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माऊलींच्या पालखी सोहळ्याची साक्षीदार 'इंद्रायणी' आज सुनी-सुनी - palkhi news

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो भाविक आळंदीत येत असतात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी इंद्रायणी काठ सुना-सुना वाटत आहे. दुथडी भरुन वाहणाऱ्या इंद्रायणीत स्नान करण्यासाठी एकही वारकरी दिसत नाही.

aalandi
माऊलींच्या पालखी सोहळ्याची साक्षीदार 'इंद्रायणी' आज सुनी-सुनी

By

Published : Jun 13, 2020, 4:52 PM IST

Updated : Jun 13, 2020, 5:58 PM IST

पुणे - दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन नगरीत आषाढी वारी सोहळा होत असतो. या सोहळ्यासाठी जगभरातून वारकरी हे आळंदीच येत असतात. हे वारकरी इंद्रायणी काठावर स्नान करुन, माऊलींच्या या सोहळ्यात सहभागी होतात. आज (शनिवार) हा सोहळा होत असताना इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असताना या नदीमध्ये स्नान करण्यासाठी वारकरी मात्र नाही.


कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी आषाढी वारी सोहळा हा मर्यादित करण्यात आला आहे. त्यामुळे माऊलींच्या या नयनरम्य सोहळ्यात वारकरी सहभागी नाहीत. त्यामुळे अलंकापुरीतून खळखळ वाहणारी इंद्रायणी नदी वारकऱ्यांची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, हा भक्तीचा महिमा आज इंद्रायणी घाटावर दिसत नाही.

माऊलींच्या पालखी सोहळ्याची साक्षीदार 'इंद्रायणी' आज सुनी-सुनी
प्रत्येक वर्षी आषाढी वारी सोहळ्याला इंद्रायणी घाटावर लाखोंच्या संख्येने वैष्णवांचा मेळा पाहायला मिळतो. याची साक्ष आजही इंद्रायणी नदी देत आहे. मात्र, यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाकडून आषाढी वारी सोहळा मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत साजरा होत असल्याने इंद्रायणी चा परिसर मोकळा श्वास घेत आहेत.
Last Updated : Jun 13, 2020, 5:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details