पुणे- राज्यामध्ये बळीराजाच्या डोक्यावर दुष्काळाचे संकट असतानाही हातातील शेतीचे काम सोडून बळीराजा आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आळंदी नगरीत दाखल झाला आहे. या ठिकाणी आलेल्या भक्तांनी माऊलींचा महिमा अतूट असून बळीराजावर आलेले दुष्काळी संकट विठूमाऊलीच्या कृपेने दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
दुष्काळी संकट विठूमाऊलीच्या कृपेने दूर व्होवो.. आषाढी वारीसाठी बळीराजा आळंदीमध्ये दाखल - बळीराजा
हातातील शेतीचे काम सोडून बळीराजा आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आळंदी नगरीत दाखल झाला आहे.
देवाच्या आळंदीत वारकऱ्यांच्या वैष्णवांचा मेळा होत असताना कष्टकरी बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला आहे. तर दुसरीकडे आपल्यावर आलेले संकट माउलींच्या चरणी सांगून दूर करण्यासाठी हा बळीराजा आषाढी वारीत सहभागी होऊन आळंदी ते पंढरपुर पायी वारी करणार आहे. हे देवा आमच्यावर आलेले हे दुष्काळी संकट दूर कर, असे साकडे हा बळीराजा माऊलीला घालणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होत असताना राज्यभरातून अनेक वारकरी शेतातील कामे सोडून देहू व आळंदी येथून वारीमध्ये सहभागी होत आहेत.