पुणे -महायुतीने सरकार चालवावे आणि इतर पक्षांनी विरोधकांची भूमिका घ्यावी, यासाठी महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असणार, असे खासदार अमर साबळे म्हणाले. बारातमती येथे त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
'देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार' - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रकरण
महायुतीने गेल्या ५ वर्षात अत्यंत चांगला कारभार केला आहे. तो जनतेने मान्य केला आहे. जनतेने मताच्या स्वरुपात राजमान्यता दिली आहे. त्यामुळे असणार्या मतभेदांवर तोडगा काढून देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन करतील, असा विश्वास खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महायुतीमध्ये चर्चा होईल. त्यामधून मतभेदांवर तोडगा निघेल आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापन करतील. सरकार स्थापनेमध्ये शिवसेनेचे अत्यंत मोलाचे योगदान राहणार आहे. महायुतीने गेल्या ५ वर्षात अत्यंत चांगला कारभार केला आहे. तो जनतेने मान्य केला आहे. जनतेने मताच्या स्वरुपात राजमान्यता दिली आहे. त्यामुळे असणार्या मतभेदांवर तोडगा काढून देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन करतील, असा विश्वास खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला आहे.