महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pimpri : फडणवीसांच्या ताफ्यावर चप्पल भिरकवल्याने पिंपरीत राजकारण तापले; भाजप-राष्ट्रवादीचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप - pimpri chinchwad news

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने चप्पल फेक ( Devendra Fadnavis threw slippers at convoy ) केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात चांगलंच राजकारण तापलं आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या कार्यकत्यांकडे बोट दाखवत त्यांनीच चप्पल फेकल्याचा आरोप केला आहे.

pimpri chinchwad news
भाजपा नेते नामदेव ढाकणे

By

Published : Mar 7, 2022, 6:24 PM IST

Updated : Mar 7, 2022, 7:09 PM IST

पिंपरी-चिंचवड - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने चप्पल फेक ( Devendra Fadnavis threw slippers at convoy ) केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात चांगलंच राजकारण तापलं आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या कार्यकत्यांकडे बोट दाखवत त्यांनीच चप्पल फेकल्याचा आरोप केला आहे. भाजप कार्यकर्त्यांची अशी संस्कृती नाही म्हणत हे आरोप सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाकणे यांनी फेटाळले आहेत. तर, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून चप्पल फेकली असल्याचा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.

प्रतिक्रिया

भाजपा राष्ट्रवादी नेत्यात आरोप प्रत्यारोप

पिंपरीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विविध विकास कामाच्या उद्घाटनानिमित्त आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत, ज्या-ज्या ठिकाणी उद्घाटन आहे. तिथे भाजपावर भ्रष्टचाराचा आरोप करत काळ्या फिती बांधून अन जोरजोरात घोषणाबाजी करून विरोध दर्शवला. दरम्यान, पूर्णानगर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यानासमोर राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली, त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला, काही अंतरानेच फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा आला आणि अज्ञात व्यक्तीने ताफ्यावर चप्पल फेकली. ही चप्पल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फेकली असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केलाय. तर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भाजपच्या कार्यकत्यांकडे बोट केले आहे.

हेही वाचा -देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

Last Updated : Mar 7, 2022, 7:09 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details