पुणे : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर ( BJP Protest Against Ajit Pawars Statement ) केलेल्या विधानाने त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष ( Chhatrapati Sambhaji Maharaj is a Dharmavir ) तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून ( BJP Protest Against Ajit Pawars Statement ) आंदोलने केली जात आहेत. तर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील याविषयी आपले मत व्यक्त करीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून, ज्याला धर्मवीर म्हणायचे आहे त्यांनी धर्मवीर म्हणावे, ज्याला स्वराज्यरक्षक म्हणायचे आहे, त्याने स्वराज्यरक्षक म्हणावे, असे म्हटले. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रियायावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणायला कोणाचीही ना नाही, ते स्वराज्यरक्षकच आहेत. पण, ते धर्मवीर नाही असे म्हणणे हा एक प्रकारे संभाजी महाराज यांच्या विचारांचा द्रोह आहे. संभाजी महाराज यांच्यावरचा हा अन्याय आहे.