महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन् मेलेला नेता म्हणून मला नरकात पाठवले - देवेंद्र फडणवीस - नाट्य कंपनी

मेलेला नेता म्हणून त्याठिकाणी गेलो आणि मला नरकातच पाठवले, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान, मुलाखतीच्या शेवटी 'मी या कार्यक्रमात पुन्हा येईल' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि विद्यार्थ्यांमध्ये टाळ्या शिट्या पडल्या.

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

By

Published : Jan 11, 2020, 8:22 PM IST

Updated : Jan 11, 2020, 9:26 PM IST

पुणे- शालेय जीवनात आणि गणेशोत्सवात अनेक नाटकं केली. त्यामध्ये दोनदा नेत्याचा रोल वाट्याला आला होता. एकदा तर मेलेला नेता म्हणून मी यमसदनी गेलो होतो, तेव्हा तर त्या ठिकाणी मला नरकात पाठवलं गेलं, असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.

देवेंद्र फडणवीस
एक अभिनेता म्हणून सोलापूरकरांनी यावेळी फडणवीसांना कधी नाटकात काम केलं का? असा प्रश्न विचारला. यावर विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शाळेमध्ये असताना नाटकात काम केलं. त्यानंतर गणेशोत्सवात एक नाटक बसवले त्यामध्ये काम केले असल्याचे सांगितले. गणेशोत्सवात नाटक सादर करायचे म्हणून दुकानात जाऊन एक नाटकाचे पुस्तक विकत आणत असे, अशा प्रकारे सात-आठ वर्षे नाटकं बसवली होती. त्यातही मला दोनदा नेत्याची भूमिका मिळाली होती, असे फडणवीस म्हणाले.पुढे ते म्हणाले, एक नाटक असे होत की सर्व जण मेले आहेत आणि स्वर्गाच्या दारावर गेले आहेत. त्याठिकाणी यम बसलेला असतो. तेव्हा, यम आम्हाला स्वर्गात की नरकात बसायवाचे असे म्हणतो आणि मला त्याने नरकात बसवले गेले. मेलेला नेता म्हणून त्याठिकाणी गेलो आणि मला नरकातच पाठवले, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान, मुलाखतीच्या शेवटी 'मी या कार्यक्रमात पुन्हा येईल' अस देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि विद्यार्थ्यांमध्ये टाळ्या शिट्या पडल्या.
Last Updated : Jan 11, 2020, 9:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details