पुणे : गुरूवारी राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध घटक तसेच देव देवस्थानसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिर तसेच विविध मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सध्या पुण्यातील या भिमाशंकर मंदिरात कोणकोणती विकास कामे सुरू आहेत. कोणती कामे करायला हवीत याबाबत आढावा घेतला आहे.
सध्या सुरू असलेली विकासकामे :सध्या पुण्यातील खेड तालुक्यातील असलेल्या या भिमाशंकर मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मंदिर तसेच मंदिर परिसरात विकास कामे सुरू आहे.यात प्रामुख्याने परिसर विकासाची कामे सुरू आहेत. मंदिराच्या बाजूला प्राचीन दगडी काम देखील सुरू आहे. तसेच भिमा नदी पात्राचे देखील विकास कामे हे सुरू आहे. मंदिरांच्या पायऱ्यांचे काम सुरू आहे. मंदिर परिसरात नवीन शौचालये बसवण्याचे काम सुरू आहे. काही कामे देखील प्रलंबित आहे. अशी माहिती यावेळी भिमाशंकर मंदिराचे मधुकर गवांदे यांनी दिली आहे.
कोणकोणती कामे आहे प्रलंबित : यावेळी विश्वस्त मधुकर गवांदे म्हणाले की मंदिर तसेच मंदिर परिसरात खूप काही विकासकामे प्रलंबित आहेत. प्रामुख्याने मंदिरात जे भाविक राज्यभरातून दर्शनासाठी येत असतात, त्यांच्यासाठी स्नानाची व्यवस्था करण्यात यावी. भिमा नदीच्या उगमस्थळी जे ज्ञानव्यापी पातळ गंगा आहे. त्या ठिकाणी जवळपास एकाच वेळी 100 ते 150 लोक स्नान करतील आणि तिथे कायमची पाण्याची व्यवस्था व्हावी, हे काम सुरू आहे. बाजूलाच हॉल असून त्याचे काम आणि तिथे शौचालय देखील झाले पाहिजे. दुसरे म्हणजे खूप महत्त्वाचे असून यासाठी आम्ही मंदिर प्रशासन म्हणून पंतप्रधान यांना पत्र देखील पाठवले आहे. ते म्हणजे जागेचा विषय आहे.
भिमाशंकर परिसरात जागा कमी : भिमाशंकर मंदिर परिसर हा खूप छोटा असून याठिकाणी जागा कमी पडते.आजूबाजूला फॉरेस्टची जागा आहे. फॉरेस्टमधील 20 ते 25 एकर जागा ही आम्हाला मंदिर प्रशासनाला देण्यात यावी. हा खूप महत्त्वाचा विषय असल्याचे देखील यावेळी विश्वस्त मधुकर गवांदे म्हणाले. मंदिर प्रशासनाकडून जी जी विकास कामे प्रलंबित आहेत. त्याबाबत एक माहिती पुस्तक देखील तयार करण्यात आले आहे. यात सविस्तर अशी माहिती देखील देण्यात आली आहे. कोणकोणती विकास कामे हे प्रलंबित आहेत. असे देखील यावेळी विश्वस्त मधुकर गवांदे म्हणाले.
हेही वाचा :Babulnath Temple: बाबुलनाथ मंदिर शिवलिंगाला भेग, अभिषेक करण्यास भाविकांना बंदी