पुणे - 'सध्या देशात सुरू असलेला सावरकर हा महत्त्वाचा मुद्दा नाही त्यापेक्षा विकासाचा मुद्दा अधिक महत्वाचा आहे', असे मत काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हुसेन दलवाई म्हणाले, "देशातील बंद पडलेल्या कंपन्या सुरू कशा होतील आणि तरुणांना रोजगार कसा मिळेल, याचा विचार करणे गरजेचे आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्रीत आणून त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, याचे स्वप्न लोकांना दाखवणे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे"