पुणे- पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची आठवण काढली तर त्यांसोबत नाव लागते मस्तानीचे. मस्तानी पुण्याजवळील पाबळ येथे वास्तव्यास होती. अखेरच्या श्वासापर्यंत मस्तानीने बाजीरावांच्या शौर्याची गाथा याच ठिकाणाहून गायली. या पाबळमध्ये आता मस्तानीच्या 9 व्या वंशातील कुटुंबीयांनी मस्तानीच्या समाधी स्थळाला भेट दिली.
पराक्रमी योद्धा म्हणून बाजीरावांकडे पाहिले जाते आणि त्यानंतर नृत्यांगना तलवारबाजीसह अनेक शस्त्रविद्या पारंगत असलेली धुरंदर योद्धा म्हणून मस्तानीची एक वेगळी ओळख आहे. मात्र, बाजीराव व मस्तानीच्या मृत्यूनंतर मस्तानीची समाधी पाबळ या ठिकाणी बांधण्यात आली. ज्या मस्तानीची ओळख संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी राहिली त्या मस्तानीचे समाधीस्थळ आज दुर्लक्षित असल्याची खंत मस्तानीच्या नव्या पिढीने व्यक्त केली.