पुणे -एखाद्या विषयावर प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आहोत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समन्वयातून जो काही निर्णय होईल तो अंतिम असेल. सध्या या तीन नेत्यांच्यात एक मत असून त्यात कुठलीही शंका नसल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. एनआरसी सीएएबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवार बोलत होते.
महाविकास आघाडीत सर्वोच्च नेत्यांचा निर्णय अंतिम - उपमुख्यमंत्री अजित पवार - malegaon sugar factory election
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समन्वयातून जो काही निर्णय होईल तो अंतिम असेल. सध्या या तीन नेत्यांच्यात एक मत असून त्यात कुठलीही शंका नसल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
राज्याचे लक्ष लागून असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात झाली असून आपला मतदानाचा हक्का बजावल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, की उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 6 तारखेला अर्थसंकल्प सादर करणार आहे. याबाबतचा अहवाल कामकाज सल्लागार समितीने तयार केला आहे. तसेच मुंबईच्या कामकाजाबाबत जे काही प्रश्न असतील त्याबाबत मुंबईत बोलले जाईल. त्यासंबंधी पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करतील.