बारामती - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जाहीररीत्या फटकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि पवार कुटुंबीयांत अनेक घडामोडी घडत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका काय याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, बारामतीच्या दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पार्थ पवार यांच्या विषयी काहीही बोलण्यास नकार दिला.
राष्ट्रवादी कौटुंबिक कलह : पार्थ पवार यांच्याविषयी बोलण्यास अजित पवारांनी दिला नकार - पार्थ पवार प्रकरण अजित पवार प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार हे ठरल्याप्रमाणे नियमित शनिवार आणि रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर असतात. आज (रविवारी) त्यांनी बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी करत माहिती घेतली. तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नियमित शनिवार आणि रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर असतात. आज (रविवार) त्यांनी बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी करत माहिती घेतली. तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शरद पवारांनी नुकतेच पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची काय भूमिका असणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत बारामतीच्या दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, काल (शनिवार) पार्थ पवार याची नाराजी दूर करण्यासाठी काका श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ पोहोचले होते. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात उशिरा रात्री ही बैठक झाली. यावेळी श्रीनिवास पवार यांनी पार्थ यांची समजूत काढली. बैठकीला खुद्द अजित पवारही उपस्थित होते. तर यासोबतच अजित पवार, पार्थ पवार यांची आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची संयुक्तिक चर्चा झाल्याचेही समजते.