बारामती -आपल्या श्रद्धास्थानाचा मुद्दा काढून आनखी नवे प्रश्न निर्माण करायचे नसतात. तीनशे चारशे वर्षापूर्वी येथे काही तरी होते. तेथे काही तरी होते. असे मुद्दे देशात काढले जात आहेत. जे झालं ते झालं ते कशाला आता का काढता तुम्हाला काही करायचे असेल नविन करा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी ज्ञानवापी मशिदीच्या चर्चेवरून भाजपावर निशाणा साधला आहे. बारामतीत एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
Ajit Pawar Criticized BJP : ज्ञानवापीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाव घेता भाजपावर टीका; म्हणाले... - बारामतीत अजित पवारांची ज्ञानवापीवरुन टीका
ज्ञानवापीवरून ( Gyanvapi mosque Issue ) उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी विरोधकांवर टीका केली आहे. जे झालं ते झालं ते कशाला आता का काढता तुम्हाला काही करायचे असेल नविन करा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्ञानवापी मशिदीच्या चर्चेवरून भाजपावर ( BJP ) निशाणा साधला आहे.
![Ajit Pawar Criticized BJP : ज्ञानवापीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाव घेता भाजपावर टीका; म्हणाले... Ajit Pawar Criticized BJP](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15417598-thumbnail-3x2-a.jpg)
जीएसटीबाबत केंद्र सरकार खुप आग्रही आहे. तुम्ही सांगितलेल्या अडचणी आम्ही फार तर जीएसटी कॉन्सिल समोर मांडू परंतू राज्य सरकारला त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. जीएसटीबाबत ज्या सुचना केल्या आहेत. त्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुमची अडचण होते. हे मलाही कळते. अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिला. ज्या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाले, उपमुख्यमंत्री पद आतापर्यंत मिळाले. त्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरातील पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे. तिथे शिक्के मारायला आम्ही आलो नव्हतो. तुम्हीच ती लोकं निवडून देता. मला कोणावरही टिका करायची नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाकडी निंबोडी योजनेवरून सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकिय परिस्थितीवर भाष्य केले.
हेही वाचा -BJP women activists attack : दीपाली सय्यद विरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची पोलीसांत तक्रार