पुणे :बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींना परवानगी दिली आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र सरकारच्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज हा निकाल देण्यात आला. 'जल्लीकट्टू', बैलगाडी शर्यतींना परवानगी देण्याच्या तामिळनाडू, महाराष्ट्र सरकारच्या कायद्यांना याचिकांमध्ये आव्हान देण्यात आले होते. न्यायमूर्ती केएम जोसेफ, अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषिकेश रॉय आणि सीटी रविकुमार यांचा समावेश असलेल्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिला आहे.
आजचा निकाल शेतकऱ्यांचा :राज्यात बैलगाडी शर्यत सुरू असताना काही संघटनांनी त्याविरोधात न्यायालयात गेल्या. त्यांनी बैल हा प्राणी धावणारा नसल्याचा दावा याचिकेत केला होता. त्यामुळे आम्ही हा कायदा केला तेव्हा कायद्याला पुन्हा स्थगित दिली होती. आम्ही एक समिती स्थापन करून बैलांच्या धावण्याच्या क्षमतेचा वैज्ञानिक अहवाल तयार केला. बैल हा धावणारा प्राणी आहे. मी मुख्यमंत्री असताना आम्ही अहवाल तयार केला. आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालय, नंतर माननीय सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला. त्यानंतर आता आमचे नवीन सरकार आल्यानंतर जेव्हा हे प्रकरण आले तेव्हा आम्ही सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांना विनंती केली. तेव्हा मेहता यांनी बाजी सरकारची बाजु मांडली. महाराष्ट्राच्या वतीने त्यांनी उभे राहून आणि रनिंग अबिलिटी ऑफ बुल म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे. असा युक्तीवाद केला तेव्हा आजचा निकाल आला आहे. हा निकाल शेतकऱ्यांचा निकाल आहे. हा महाराष्ट्राचा विजय असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.