महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळ: नुकसानग्रस्त भागाला अजित पवारांची भेट, तातडीने पंचनामा करण्याचे आदेश - निसर्ग चक्रीवादळ न्यूज

निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पाहणी केली. तसेच तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Pune
नुकसानग्रस्त भागाला अजित पावरांची भेट

By

Published : Jun 5, 2020, 3:21 PM IST

Updated : Jun 5, 2020, 3:38 PM IST

पुणे -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मावळ परिसराची आज (शुक्रवार)पाहणी केली. या वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, तातडीने पंचनामा करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. यावेळी जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.

नुकसानग्रस्त भागाला अजित पावरांची भेट
निसर्ग चक्रीवादळाचा मावळ परिसरासह पुणे जिल्ह्याला फटका बसला आहे. वादळ आणि मुसळधार पावसामुळे घरांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मावळ परिसरात शेतकऱ्यांनी विविध उत्पन्नासाठी उभ्या केलेल्या पॉलीहाऊसचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी अजित पवारांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मावळमधील भोयरे आणि पवळेवाडी येथील नुकसानीची पाहणी त्यांनी केली.उद्या (6 जून) लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात योग्य ते निर्णय घेवून, मदत केली जाईल. आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागितली असून, केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
Last Updated : Jun 5, 2020, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details