पुणे - पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले म्हणून मीही कसे का होईना, पण चार वेळा उपमुख्यमंत्री झाल्याचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते.
हेही वाचा - आमीर खानची बारामतीत मुक्काम करण्याची इच्छा
यावेळी झालेल्या कार्यकर्ता मेळव्यात बोलताना पवार म्हणाले, की आम्ही अनेक वर्ष मुख्यमंत्री पदावर असलेल्यांबरोबर काम केलेले कार्यकर्ते आहोत. पवार साहेब ही चार वेळा मुख्यमंत्री झाले म्हणून मीही कसे का होईना चार वेळा उपमुख्यमंत्री झालो. मात्र, आम्ही कोणाला त्रास न देता लोकशाही मार्गाने कारभार केला. गेल्या पाच वर्षातील साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भाजप विचाराच्या लोकांनी त्रास देण्याचे काम केल्याचे पवार म्हणाले.
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बारामती कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
पुढे बोलताना पवार म्हणाले, की आपल्या पाठिंब्याच्या जोरावर माझ्यासारखा कार्यकर्ता अनेकदा बारामतीतून विजयी झाला. यंदा आपण मला प्रचंड मताधिक्याने निवडून दिल्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. त्यातच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासूनच रात्रंदिवस कामाला सुरुवात केली असल्याचेही ते म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार आल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आमच्या सरकारच्या कार्यकाळात अनेक महिलांना, तरुणांना रोजगार मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. प्रत्येकाला आपण रोजगार कसा मिळेल यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचेही पवार म्हणाले. महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. 2 लाखापर्यंतचा कर्जमाफीचा निर्णय झाला असून 2 लाखांहून अधिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातही निर्णय चालू आहे. तसेच नियमित कर्ज फेडण्याऱ्या शेतकऱ्यांचाही विचार चालू आहे. यासंबंधी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली असून माहिती गोळा करण्याचे काम चालू आहे. माहिती मिळताच बारामतीसाठी 120 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम मिळेल असेही यावेळी पवार म्हणाले.
जाणून बुजून सहकार खाते राष्ट्रवादीकडे घेतले...