महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी सज्ज राहा - अजित पवार - बारामती कोरोना न्यूज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा, अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या. दरम्यान, यावेळी काही डॉक्टर, कंपन्यांनी मदत दिली.

baramati
बारामती

By

Published : May 22, 2021, 5:50 PM IST

बारामती (पुणे) -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील कोरोना परिस्थितीची आढावा घेतला. तसेच, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज राहा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा, अशा सूचना अजित पवार यांनी आज (22 मे) दिल्या. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात याबाबतची बैठक झाली.

यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना; तसेच ऑक्सिजन, म्यूकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. या बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

डॉक्टर, कंपन्यांकडून मदत

या आढावा बैठकीपूर्वी मॅगनम इंटरप्राइजचे विकास सराफ यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका व सर्वे करणाऱ्या पथकाला एन 95 व सर्जिकल मास्क, फेश शिल्ड, सॅनिटायझर देण्यात आले. फेरोरा कंपनीकडून 100 बेडशीट, 20 ऑक्सिमीटर देण्यात आले. लंडनमधील डॉ. गौतम राजे यांच्याकडून 12 स्ट्रेचर्स व इंदू केअर फार्माचे डॉ. रामदास कुटे यांच्याकडून सिल्वर ज्युबली रुग्णालयास शतप्लसच्या 500 बॉटल, सुरिया अत्तार यांच्याकडून 10 हजार रूपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला.
हेही वाचा -'राज्यपालांच्या डोक्यात काय आहे, तेच माहिती नाही'; मंत्री गुलाबराव पाटलांनी डागले टीकास्त्र

ABOUT THE AUTHOR

...view details